पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये बाबरने 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात बाबरने ही कामगिरी नोंदवली. टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6000 धावा करणारा बाबर हा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.

 

बाबरने 165 टी-20 डावात हा विक्रम नोंदवला. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6000 धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने टी-20 कारकीर्दीतील 162 डावात 6000 धावा पूर्ण केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावा करणारा बाबर आझम हा वेगवान आशियाई फलंदाज आहे. इतकेच नव्हे तर तो टी-20 क्रिकेटमध्ये वेगवान 3 हजार, 4 हजार आणि 5 हजार धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज आहे.

 

बाबर आझमची तुलना विराट कोहलीशी केली जाते. वेगवान 6000 टी 20 धावांबद्दल बोलायचे झाले तर, कोहलीने आपल्या कारकीर्दीत 184 डावांमध्ये 6000 टी -20 धावा पूर्ण केल्या आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा केल्या. हा सामना पाकिस्तानने 4 गड्यांनी खिशात टाकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने नाबाद 74 धावांची जबरदस्त खेळी केली.