Babar Azam Record: पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना ब्रायन लारा स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने ५ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यात बाबर आझमचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. पण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार खेळाडूला मागे सोडलं आहे.

बाबर आझमने या सामन्यात फलंदाजी करताना ४७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचं अर्धशतक अवघा ३ धावांनी हुकलं. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शाकिब अल हसनला मागे टाकलं आहे. बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना आतापर्यंत ३५८ सामन्यातील ३१९ डावात ४६.२० च्या सरासरीने १४७४० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३१ शतकं आणि १०२ अर्धशतकं झळकावली आहेत.

तर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९१ सामन्यातील ४४७ डावात फलंदाजी करताना १४७३० धावा करण्याची नोंद आहे. तो ऑक्टोबर २०२४ मध्ये शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ शतकं आणि १०० अर्धशतकं झळकावली आहेत.

बाबर आझम आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. बाबर आझमला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला हवी तशी कामगिरी करता करता आली नव्हती. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धेनंतर पाकिस्तानचा संघ टी -२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पण या संघात बाबर आझमला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे ही त्याची पुनरागमनाची मालिका होती. पुनरागमन करताच पहिल्याच सामन्यात त्याने ४७ धावांची खेळी केली. त्याला अर्धशतक पूर्ण करून मोठी खेळी करण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली.