पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा टी२० सामना काल खेळला गेला आणि त्यात पाकिस्ताने ७ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. या विजयाने तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत पाकिस्ताने १-१ अशी बरोबरी केली. बाबर व मोहम्मद या दोघांनीच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. बाबरचा फलंदाजी मधला सूर आशिया चषक २०२२ स्पर्धेत बिघडला होता, परंतु आज त्याने कहर केला. त्याने ६६ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ११० धावा करताना २६वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. रिझवानने ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८८ धावा केल्या.

इंग्लडचे २०० धावांचे लक्ष्य बाबर व रिझवान या जोडीने सहज पार केले. टी-२० क्रिकेटमध्ये २०३ धावांची ही भागीदारी धावांचा पाठलाग करतानाची सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०२१ मध्ये बाबर व रिझवान यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९७ धावा जोडल्या होत्या. यावेळी आउट ऑफ फॉर्म असणाऱ्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने इंग्लंड विरुद्ध शतक करताच अनेक विक्रम मागे टाकले आहे.

कालच्या सामन्यात बाबर आझम याने ६६ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकार लगावत नाबाद ११० धावा केल्या. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीचा अक्षरशः घामटा काढला. शतक साजरे करताच त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा याची बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित आणि स्वित्झर्लंडचा फहीम नजीर यांचाच समावेश होता. या दोघांनीही प्रत्येकी २-२ शतके केली आहेत. आता या यादीत बाबरचा समावेश आला आहे. त्याचबरोबर तो पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

बाबरने या खेळीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा ओलांडताना विराट कोहलीचा विक्रम मोडला. बाबरने २१८ इनिंग्जमध्ये हा पल्ला गाठला, तर विराटला २४३ इनिंग्ज खेळाव्या लागल्या होत्या. या विक्रमात ख्रिस गेल २१३ इनिंग्जसह अव्वल स्थानावर आहे.

पाकिस्तानच्या सलामीवीरांनी टी२०त पाचवेळा १५०+ धावांची भागीदारी केली आहे. रोहित शर्मा व शिखर धवन यांनी दोन वेळा हा पराक्रम केला. बाबरचा साथी मोहम्मद रिझवान यानेही ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ८८ धावा केल्या. बाबर- मोहम्मद रिझवान या जोडीने ३ चेंडू शिल्लक राखत २०३ धावा केल्या.