आनंदी ‘आनंद’ ! मलेशिया ऑलिम्पिकमध्ये भारताची विजयी सलामी

आनंद हा बार्शीचा आहे.

आनंद मुसळे

मलेशिया येथे सुरू असलेल्या स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताच्या आनंद मुसळेने पहिल्या फेरीत सिंगापूरवर विजय मिळवला. आनंदने सिंगापूरच्या चाँग जीनचा २१-१६, २१-१६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. २८ जून ते ४ जुलै या कालावधीत क्वालालंपूर येथे ही स्पर्धा होत आहे. आनंद हा मूळ बार्शीचा असून मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय स्टुडंट ऑलिम्पिकसाठी त्याची निवड झाली आहे.

स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ६ सुवर्णपदक  मिळवल्यानंतर आनंदची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्येही आनंदने चकमदार कामगिरी करुन दाखवली. गुजरातच्या बडोदा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत आनंदने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आनंदची निवड झाली आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिल्या फेरीत आनंदने विजयी सलामी दिली. त्याने सिंगापूरच्या चाँग जीनचा २१-१६, २१-१६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्याच्या या विजयाने बार्शीसह महाराष्ट्राला अत्यानंद झाला आहे. आनंद बार्शीतील शिवाजी महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून तो नाईकवाडी प्लॉट येथे राहतो.

बॅडमिंटन क्रीडा प्रकारात आनंदचा परफॉर्मन्स कौतूकास्पद असून तो बॅडमिंटन स्पर्धेत पाचवेळा विश्वचॅम्पियन राहिलेल्या चीनच्या ‘लीन डॅन’ला आदर्श मानतो. तसेच मलेशियाच्या ‘ली चोंग वेईलाई’ फॉलो करत आहे. आनंदच्या आंतरराष्ट्रीय निवडीमुळे त्याच्या आई-वडिलांसह बार्शीकरांनाही अत्यानंद झाला आहे. या स्पर्धेतही आनंदने सुवर्णकमाई करुन जगभरात बार्शीचे आणि देशाचे नाव मोठे करावे, अशी इच्छा त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Badminton at the student olympic games malaysia indian shatler anand musale win

ताज्या बातम्या