Rohit Sharma Gets Angry Viral Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. रोहितने इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करून ही घोषणा केली. त्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा स्टँडची घोषणा करण्यात आली. या ओपनिंग सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो व्हिडिओ काढणाऱ्या चाहत्यावर संताप व्यक्त करताना दिसून येत आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेत आज होणारा सामना हा मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध होणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहित आपली पत्नी रितिका, मुलगी समायरा, मुलगा आहान आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत पार्कमध्ये वेळ घालवताना दिसून येत आहे. त्यावेळी एक चाहता मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करताना दिसून आला.
रोहित शर्मा आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत असतो. चाहता व्हिडिओ शूट करतोय हे रोहितच्या लक्षात येताच रोहितने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि ‘ कॅमेरा बंद कर..’ असे म्हणाला. रोहितने केलेला इशारा पाहून चाहत्याने व्हिडिओ शूट करणं थांबवलं. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. यावर नेटकऱ्यांनी आपलस प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. नेटकऱ्यांच्या मते , असं व्हिडिओ शूट करणं खूप चुकीचं आहे.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाला सलामीला फलंदाजी करताना दमदार सुरूवात करून देत आहे. या हंगामातील सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्माची बॅट शांत राहिली. मात्र, त्यानंतर रोहितने दमदार कमबॅक केलं. त्याने एका पाठोपाठ एक अर्धशतकं झळकावली आणि मुंबईला स्पर्धेत कमबॅक करून दिलं. रोहितच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३०० धावा केल्या आहेत. ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो इथून पुढे कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही. तो केवळ वनडे क्रिकेट आणि आयपीएल खेळताना दिसून येणार आहे.