भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) आर्थिक खाण ठरलेल्या आयपीएलचा यंदाचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरूतील आयटीसी गार्डेनियाच्या म्हैसूर हॉलमध्ये रंगणार आहे. आयपीएल लिलावाचे सूत्रसंचालन या क्षेत्रात प्रसिद्ध असलेले रीचर्ड मॅडले करणार आहेत. यापूर्वी झालेल्या आयपीएल लिलावांचे सूत्रसंचालन मेडले यांनीच केले होते.
‘‘प्रतिस्पर्धी संघांशी दोन हात करताना कोणती रणनीती संघ आखतो, हे खेळाडूंवर अवलंबून असते. त्यामुळे यंदाच्या आयपीएलच्या सातव्या हंगामाचा लिलाव दिमाखदारपणे होईल. या वर्षी खेळाडूंचा लिलाव उत्साहपूर्वक आणि अविस्मरणीय असेल, यामध्ये कोणतीच शंका नाही,’’ असे आयपीएलचे अध्यक्ष रणजिब बिस्वाल यांनी सांगितले.