Bangladesh vs England 4th T20I Match: बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत एक चमत्कार घडला आहे. यजमान बांगलादेशने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत विश्वविजेत्या इंग्लंड क्रिकेट संघाचा ३-० असा पराभव करून इतिहास रचला आहे. बांगलादेशने आपल्या क्रिकेट इतिहासात प्रथमच हा पराक्रम केला आहे. मीरपूर येथे झालेल्या तिसर्‍या टी-२० मध्ये बांगलादेशने इंग्लंडचा १६ धावांनी पराभव करत क्लीन स्वीप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना, लिटन दासच्या ७३ धावा आणि नजमुल शांतोच्या ४७ धावांच्या जोरावर २० षटकात २ गडी गमावून १५८ धावा केल्या. यादरम्यान इंग्लंड क्रिकेट संघासाठी सात खेळाडूंनी गोलंदाजी केली. परंतु केवळ आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांना १-१ विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात इंग्लंड संघाचा सलामीवीर डेव्हिड मलानने ५३ धावांची खेळी खेळून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण फिल सॉल्ट भोपळाही न फोडता बाद झाला. त्याचवेळी जोस बटलरने ३१ चेंडूत ४० धावांची खेळी करत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण तस्किन अहमदच्या किफायतशीर गोलंदाजीनंतर मुस्तफिझूर आणि शाकीबने इंग्लंडला २० षटकांत ६ बाद १४२ धावांवर रोखलं. त्यामुळे इंग्लंडला १६ धावांनी पराभव पत्कारावा लागला.

हेही वाचा – Team India: सुनील गावसकरांची मोठी भविष्यवाणी; २०२३ च्या विश्वचषकानंतर ‘हा’ खेळाडू भारताचा कर्णधार होऊ शकतो

बांगलादेशकडून तस्किन अहमदने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर तन्वीर इस्लाम, शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांनी १-१ विकेट घेतली. यासह बांगलादेशने तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० ने जिंकली. यापूर्वी, बांगलादेशने मालिकेतील पहिला सामना ६ गडी राखून जिंकला होता, त्यानंतर दुसरा सामना ४ विकेटने जिंकला होता. आता अंतिम टी-२० सामना १६ धावांनी जिंकून क्रिकेट विश्वाला चकित केले आहे.
नजमुल हुसेन शांतोला त्याच्या शानदार कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर आजच्या सामन्यासाठी लिटन दासला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

बांगलादेश:लिटन दास (विकेटकीपर), रॉनी तालुकदार, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदयॉय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, शाकिब अल हसन (कर्णधार), तन्वीर इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद

इंग्लंड: फिलिप सॉल्ट, डेविड मलान, जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, रेहान अहमद आणि जोफ्रा आर्चर</p>

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh has created history by sweeping england in the t20i series 2023 vbm
First published on: 14-03-2023 at 22:05 IST