Asia Cup 2025 BAN vs AFG Highlights: आशिया चषक स्पर्धेतील ९ वा सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशने २० षटकांअखेर ५ गडी बाद १५४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा डाव १४६ धावांवर आटोपला. या विजयासह बांगलादेशचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. पण तिसऱ्या स्थानी असलेल्या अफगाणिस्तानकडे अजूनही सुपर ४ मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.
BAN vs AFG: अफगाणिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव
या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
BCCI च्या निवडसमितीत मोठा बदल होणार? या २ दिग्गज खेळाडूंची होऊ शकते एन्ट्री
अफगाणिस्तानला लागोपाठ २ मोठे धक्के
अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. दरम्यान १९ व्या षटकात अफगाणिस्तानला लागोपाठ २ मोठे धक्के बसले आहेत.
अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. शेवटच्या १२ चेंडूत २७ धावांची गरज आहे.
IND A vs AUS A: १९ वर्षीय फलंदाज भारतीय संघावर भारी पडला! पहिल्याच सामन्यात ठोकलं दमदार शतक
BAN vs AFG Live: बांगलादेशने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी ठेवलं १५५ धावांचं आव्हान
बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनने २० षटकांअखेर ५ गडी बाद १५४ धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १५५ धावा करायच्या आहेत. बांगलादेशकडून फलंदाजी करताना तंझीद हुसेनने ५२ धावांची खेळी केली आहे.
Asia Cup 2025: UAE विरूद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानचा मोठा निर्णय! नेमकं प्रकरण काय?
ठरलं! टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार Apollo Tyres चा लोगो; BCCI ला प्रत्येक सामन्यासाठी किती पैसे मिळणार?
BAN vs AFG Live: बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय! पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
अफगाणिस्तान- इब्राहिम जादरान, मोहम्मद नबी, सेदिकुल्लाह अटल, रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनत, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गजनफर, फजलहक फारूकी.
बांगलादेश- सैफ हसन, तंजीद हसन तमीम,लिटन दास (यष्टीरक्षक/कर्णधार), तौहीद हृदोय, मेहदी हसन, नुरुल हसन, जाकेर अली, शमीम हुसेन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद.