Taskin Ahmed Got Hitwicket After Hitting Six: बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २७ ऑक्टोबरला पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये करण्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशवर १६ धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशच्या पराभवापेक्षा तस्कीन अहमदने मारलेला शॉट तुफान चर्चेत राहिला. तस्कीनने मारलेला शॉट सीमारेषेपार गेला. पण अंपायरने त्याला बाद घोषित केलं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
षटकार मारूनही बाद कसा झाला?
या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशसमोर विजयासाठी १६६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. शेवटच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी १९ धावा करायच्या होत्या. वेस्ट इंडिजकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी रोमारियो शेफर्ड गोलंदाजीला आला. सुरुवातीच्या ३ चेंडूवर त्याने अवघ्या ३ धावा खर्च केल्या.
पुढील ३ चेंडूत बांगलादेशला विजयासाठी १६ धावा करायच्या होत्या. त्यामुळे स्ट्राईकवर असलेल्या तस्कीनने मोठा फटका मारला. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला. चेंडू बॅटला लागताच सीमारेषेपार गेला. बांगलादेशचे क्रिकेट चाहते जल्लोष करत होते. पण नेमका तेव्हाच तस्कीनचा पाय यष्टीला जाऊन धडकला आणि बेल्स खाली पडली. त्यामुळे पंचांनी त्याला हिटविकेट आऊट घोषित केलं. इथेच बांगलादेशचा डाव आटोपला आणि वेस्ट इंडिजने हा सामना १६ धावांनी आपल्या नावावर केला.
या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. याआधी झालेल्या वनडे मालिकेत बांगलादेशने वेस्ट इंडिजवर २-१ ने विजय मिळवला. वनडे मालिकेत पराभव झाला, पण टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत वेस्ट इंडिजने दमदार सुरूवात केली. मालिकेतील दुसरा सामना २९ ऑक्टोबरला आणि मालिकेतील तिसरा सामना ३१ ऑक्टोबरला रंगणार आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा संघ पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. सध्या वेस्ट इंडिजचा संघ मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे.
