बांगलादेशचा क्रिकेटपटू मोसादक हुसेनच्या पत्नीने हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचा आरोप केला आहे. हुंडा न दिल्यामुळे मोसादकने आपल्याला घरातून बाहेर काढल्याचंही पत्नी शर्मिन समायराने म्हटलं आहे. सहा वर्षांपूर्वी मोसादक आणि शर्मिन यांचा विवाह झाला होता. १३ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बांगलादेशच्या संघात मोसादकचा समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ढाका शहराच्या अतिरीक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी रोसिना खान यांनी मोसादकच्या पत्नीने केलेल्या आरोपांची दखल घेऊन, विशेष पोलिस अधिकाऱ्यांतर्फे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. bdnews24.com या स्थानिक संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. पत्नीने केलेल्या आरोपांवर मोसादकने आपली प्रतिक्रीया अद्याप दिलेली नाहीये.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांनीच मोसादक आणि शर्मिन यांच्यात खटके उडायला लागले होते. मोसादकने शर्मिनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. मात्र शर्मिनने दोघांमध्ये ठरलेल्या अधिकृत पोटगीपेक्षा जास्त रक्कम मागण्यास सुरुवात केली. हे पैसे न मिळाल्यामुळेच शर्मिन आपल्या भावावर आरोप करत असल्याचं, मोसादकचा भाऊ मोसाबर हुसेनने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladeshi cricketers wife accuses him of torture over dowry
First published on: 27-08-2018 at 14:55 IST