भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक आणि माजी निवड समिती सदस्य साबा करीम यांची बीसीसीआयच्या महाव्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. माजी महाव्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांच्या निधनानंतर करीम यांच्याकडे महाव्यवस्थापकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. १ जानेवारी २०१८ पासून साबा करीम आपला कार्यभार सांभाळतील.

साबा करीम यांनी आपल्या कारकिर्दीत ३४ वन-डे आणि एका कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर साबा करीम यांच्याकडे विराट कोहली-रवी शास्त्री, क्रिकेट प्रशासकीय समितीमधील सदस्यांशी चांगले संबंध निर्माण करण्याचं आव्हान असणार आहे. करीम बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्या अंतर्गत काम पाहतील.