राजस्थान पोलिसांचे माजी पोलीस महासंचालक अजित सिंह शेखावत, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे नवीन प्रमुख असण्याची शक्यता आहे. माजी दिल्ली पोलिस आयुक्त नीरज कुमार हे सध्या बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचं नेतृत्व करतात, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अजित सिंह बीसीसीआयमध्ये आपला पदभार सांभाळतील अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. ७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या अकराव्या हंगामाआधी अजित सिंह आपला पदभार स्विकारतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयमधली उच्चपदस्थ अधिकाऱ्याने यासंदर्भातली वृत्ताला आपला दुजोरा दिला आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकात काम करण्याचा आणि अशी प्रकरणं हाताळण्याचा अजित सिंह यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या या विशेष पथकाचं नेतृत्व करण्यासाठी अजित सिंह योग्य उमेदवार असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. राजस्थान पोलिसांमध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकात काम करताना अजित सिंह यांनी आपली कारकीर्द गाजवली होती.

अवश्य वाचा – बीसीसीआयकडून पाक क्रिकेट बोर्डाची कोंडी, महत्वाच्या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क पाक गमावणार?

अजित सिंह यांच्या कार्यकाळात राजस्थान पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने तब्बल ६०० जणांवर कारवाई केली होती. अजित सिंह हे १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ३० नोव्हेंबर २०१७ साली ते राजस्थान पोलिसांच्या सेवेतून मुक्त झाले. सध्या बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकात अवघ्या ३ व्यक्ती काम करतात. याचसोबत वर्षभरातील आंतरराष्ट्रीय सामने, स्थानिक सामने आणि आयपीएल हा पसारा पाहता अजित सिंह आपलं काम कसं करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci likely to appoint former rajasthan dgp ajit singh as acu head
First published on: 04-03-2018 at 11:31 IST