India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा दुसरा डाव २२४ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला ३९६ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामी जोडीने दमदार सुरूवात केली. सलामीला आलेल्या जॅक क्रॉउले आणि बेन डकेट यांनी मिळून ५० धावा जोडल्या. या भागीदारीसह या जोडीने भारतीय संघाविरूद्ध खेळताना मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारतीय संघाविरूद्ध असा पराक्रम करणारी पहिलीच जोडी

बेन डकेट आणि जॅक क्रॉउले ही जोडी कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरूवात करताना सर्वाधिक वेळेस ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी जोडी ठरली आहे. या जोडीने आतापर्यंत मिळून भारतीय संघाविरूद्ध खेळताना ९ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. यासह या जोडीने वेस्टइंडिजचे फलंदाज डेसमंड हेंस आणि ग्रॉर्डन ग्रिनीज या जोडीचा विक्रम मोडून काढला आहे. वेस्टइंडिजच्या या जोडीने भारतीय संघाविरूद्ध खेळताना ८ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून अबाधित होता.

या आहेत भारतीय संघाविरूद्ध खेळताना सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करणाऱ्या जोड्या

जॅक क्रॉउले आणि बेन डकेट, ९ वेळेस (इंग्लंड)
गॉर्डन ग्रिनीज आणि डेसमंड हेंस, ८ वेळेस (वेस्ट इंडिज)
अॅलिस्टर कुक आणि अँड्रयू स्ट्रॉस, ७ वेळेस ( इंग्लंड)
मॅथ्यू हेडन आणि जस्टीन लँगर, ७ वेळेस (ऑस्ट्रेलिया)
बिल लॉरी आणि बॉब सिंम्सन , ७ वेळेस (ऑस्ट्रेलिया)

इंग्लंडच्या २०० धावा पूर्ण

हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ३७४ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना बेन डकेट आणि जॅक क्रॉउले यांनी अर्धशतकी भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी जॅक क्रॉउले १४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर बेन डकेटने ५४ धावांची खेळी केली. त्याला प्रसिध कृष्णाला बाद करत माघारी धाडलं. तर ओली पोपने २७ धावांची खेळी केली. त्याला मोहम्मद सिराजने पायचीत करत माघारी धाडलं. इंग्लंडला सुरूवातीला ३ धक्के बसले. पण त्यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रुक यांनी मिळून शतकी भागीदारी केली. यासह इंग्लंडने २०० धावांचा पल्ला गाठला आहे. ब्रुकने अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर जो रूट देखील अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे.