महेश भूपतीने फ्रेंच साथीदार मायकेल लॉड्राच्या साथीने खेळताना दुबई टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारताचा रोहना बोपण्णा आणि अमेरिकेच्या राजीव राम जोडीला ६-४, ६-७ (२), १०-५ असे नमवत भूपती-लोइड्रा जोडीने अंतिम फेरी गाठली.
दुसऱ्या सेटमध्ये विजयाच्या दिशेने सहज आगेकूच करणाऱ्या भूपती-लॉड्रा जोडीला बोपण्णा-राम जोडीचा प्रतिकार सहन करावा लागला. या जोडीने सामना सुपर टायब्रेकरमध्ये नेत मुकाबला चुरशीचा बनवला. मात्र अखेर भूपती-लोइड्रा जोडीने सरशी साधली.यंदाच्या हंगामातली महेश भूपतीची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. चेन्नई खुल्या स्पर्धेत त्याला उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते.  अंतिम फेरीत या जोडीची लढत रॉबर्ट लिंडस्टेडट आणि नेनाद झिम्नोझिक जोडीशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhupathi llodra in final of dubai atp event
First published on: 02-03-2013 at 12:01 IST