IPL 2024 Nita Ambani MI Dressing Room : आयपीएल २०२४ मध्ये कॅप्टन हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंट्सने १८ धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा शेवटही गोड झाला नाही. या सामन्यात मुंबईचा संघ २१५ धावांचे आव्हान असताना २० षटकांमध्ये १९६ धावांपर्यंतच पोहोचू शकला. शेवटच्या सामन्यातील या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू अतिशय निराश होत ड्रेसिंग रूममध्ये परतले. याच सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचून निराश खेळाडूंचे सांत्वन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना विशेष शुभेच्छा दिल्या. या संदर्भातील व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

नीता अंबानी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना नेमके काय म्हणाल्या?

मुंबई इंडियन्सच्या अतिशय वाईट पराभवानंतरही नीता अंबानींनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना संबोधित करताना नीता अंबानी म्हणाल्या की, आयपीएल २०२४ चा हा सीजन आपल्या सर्वांसाठीच फार निराशाजनक होता. कोणत्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा घडत नव्हत्या. पण हे सर्व असूनही मुंबई इंडियन्सचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. फक्त मालक असल्याच्या नात्यानेच नाही; पण मला असे वाटते की, मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करणे ही खूप सन्मानाची आणि विशेष गोष्ट आहे. त्याचबरोबर या संघाशी जोडले जाणे ही गोष्टदेखील माझ्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे,

नीता अंबानी पुढे म्हणाल्या की, मला वाटतं की, आता इथून परतल्यानंतर आपण आपल्या चुकांबद्दल विचार करू.

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांची नावे घेत नीता अंबानी काय म्हणाल्या?

नीता अंबानी यापुढे म्हणाल्या की, सध्या सर्व जग आपल्याकडे पाहत आहे. अशा परिस्थितीत मी त्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊ इच्छिते; जे टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावेळी त्यांनी खासकरून रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव व जसप्रीत बुमराह या भारतीय संघात समावेश झालेल्या खेळाडूंची नावे घेत, त्यांचे अभिनंदन केले.

RCB च्या विजयानंतर जंगी सेलिब्रेशन; चाहत्यांनी पाणी उडवून, गाडीवर चढून नाचत…; बंगळुरूच्या रस्त्यांवरील VIDEO व्हायरल

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे; तर हार्दिक पांड्या उपकर्णधार आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव यांचा फॉर्म पाहता, भारतीय संघाला या दोघांकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.