द्वितीय मानांकित रोहन बोपण्णा आणि एहसाम उल हक कुरेशीने एटीपी ५०० दुबई डय़ुटी फ्री अजिंक्यपद टेनिस स्पध्रेत महेश भूपती आणि डेनीस इस्कोमिन जोडीचे आव्हान मोडीत काढले. ‘इंडो-पाक एक्स्प्रेस’ असे बिरूद मिरवणाऱ्या बोपण्णा-कुरेशीने ५-७, ७-६(३), १०-७ अशा फरकाने विजय मिळवत या स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे. दोन रंगतदार सेट्स उभय जोडीने जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये रोमहर्षक जुगलबंदी रंगली. बोपण्णा-कुरेशी जोडीची पुढील फेरीत तोमास बेडनारेक (पोलंड) आणि ल्युकास डलौही (झेक प्रजासत्ताक) जोडीशी गाठ पडणार आहे.