ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी एका आकाशवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची व्ययक्तीक टीका केल्याबद्दल माफी मागितली होती. यावर स्टुअर्ड ब्रॉडने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या चाहत्यांना संबोधनू म्हटले की, “लेहमन यांनी माझ्यावर केलेल्या टिप्पणी बद्दल माफी मागितली ती मी स्विकारतो. त्यांनी केवळ थट्टामस्करी करण्याच्या उद्देशातून चेष्टेने असे म्हटले असल्याचेही मला सांगितले.”
अॅशेस मालिकेच्या शेवटच्या कसोटीत ब्रॉड फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटला चेंडू स्पर्शकरून गेल्यानंतर झेलबाद झाल्याच्या प्रश्नचिन्हावरून लेहमन यांनी ब्रॉड उगाच फसवा खेळ करणारा खेळाडू असल्याचे म्हटले होते. तसेच काही टीकाही केली होती. त्यामुळे आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसीने) त्यांना दोषी ठरवत त्यांना २० टक्के मानधन दंड म्हणून ठोठावले आहे.
व्हिडिओ: याच कारणावरून लेहमन यांनी केली होती स्टुअर्ट ब्रॉडवर शेरेबाजी-