ICC T20 World Cup 2020 ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्या आधी भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा होणार आहे. भारतीय संघाचे विश्वचषकाआधी फारसे टी २० सामने नसल्याने सरावासाठी संघाला कमी आंतरराष्ट्रीय सामने मिळतील. २०१९ विश्वचषकात भारताला ज्या पद्धतीने स्पर्धेबाहेर पडावं लागलं होतं, तसं होऊ द्यायचं नसेल तर विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाला काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताला जबर धक्का; ‘इन-फॉर्म’ फलंदाज न्यूझीलंड दौऱ्यातून OUT

रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल या तिघांना संघात घेऊन खेळायचे असेल, तर भारताला शक्य तितक्या लवकर सलामीचा प्रश्न निकाली काढावा लागेल. चौथ्या क्रमांकावर अनेक तर्क-वितर्क लढविल्यानंतर भारतीय संघाने नवीन प्रयोग करणं हानीकारक ठरू शकेल. तसेच कामगिरीत सातत्याचा अभाव असलेल्या पंतवरही कायमस्वरूपी तोडगा वेळीच काढणं महत्त्वाचं असणार आहे. अशा परिस्थितीत T20 World Cup आधी ‘टीम इंडिया’समोर कोणकोणती आव्हानं असतील, त्याची माहिती या व्हिडीओतून घेऊया.

क्रीडाविषयक अधिक व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenges in front of team india ahead of t20 world cup
First published on: 21-01-2020 at 20:22 IST