करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरातील सर्व क्रीडा स्पर्धा बंद झालेल्या आहेत. बीसीसीआयनेही २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता आयपीएलच्या भवितव्याबद्दल अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. भारतीय संघाचे खेळाडूही सध्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये RCB चं नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसनशी इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या.

या लाईव्ह चॅटदरम्यान विराट कोहलीने आपल्या फलंदाजीपासून ते आयपीएलमधल्या कामगिरीबद्दल अनेक विषयांवर भाष्य केलं. मात्र या चॅटदरम्यान अनुष्का शर्माने, चला, जेवायची वेळ झाली…असा मेसेज करत विराटला थांबवण्याचा प्रयत्न केला. केविन पिटरसनने अनुष्काच्या या मेसेजचा स्क्रिनशॉट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यावेळी बायको वेळ संपली असं म्हणते, त्यावेळी खरंच वेळ संपलेली असते ! अशा आशयाची कॅप्शन देऊन पिटरसनने अनुष्का आणि विराटला या फोटोत टॅग केलं आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या ३ संघांचा अपवाद वगळात इतर सर्वांनी विजेतेपदं पटकावली आहेत. बऱ्याचदा विराट कोहलीचा RCB संघ सोशल मीडियावर खराब कामगिरीसाठी ट्रोल होतो. यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवता येऊ शकतं का याची चाचपणी करत आहे, मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही.