बऱ्याच कालावधीनंतर भारतीय क्रिकेटचाहत्यांमध्ये क्रिकेट ज्वर  भिनणार आहे. चॅम्पियन्स ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या सामन्यांना शनिवारपासून सुरू होत आह. त्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीत शनिवारी नॉर्दन नाइट्स (न्यूझीलंड) व सदर्न एक्सप्रेस (श्रीलंका) यांच्यात दुपारी ४ वाजता सामना होणार आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सला लाहोर लायन्स (पाकिस्तान) संघाशी खेळावे लागणार आहे.
सदर्न एक्सप्रेस संघाचा कर्णधार लसित मलिंगाने अपेक्षेप्रमाणे मुंबई संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे तर तिलकरत्ने दिलशानने कौटुंबिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे. नॉदर्न संघालाही अष्टपैलू अनुभवी डॅनियल व्हेटोरीची अनुपस्थिती जाणवणार आहे.