Chelsea beat AC Milan Wonderful of performance ysh 95 | Loksatta

चेल्सीची एसी मिलानवर सरशी

रीस जेम्सच्या (एक गोल व एक गोलसाहाय्य) अप्रतिम कामगिरीच्या जोरावर चेल्सीने यूएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या सामन्यात एसी मिलानवर ३-० अशी सरशी साधली.

चेल्सीची एसी मिलानवर सरशी
चेल्सीची एसी मिलानवर सरशी

लंडन : रीस जेम्सच्या (एक गोल व एक गोलसाहाय्य) अप्रतिम कामगिरीच्या जोरावर चेल्सीने यूएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या सामन्यात एसी मिलानवर ३-० अशी सरशी साधली. पॅरिस सेंट-जर्मेनला मात्र बेन्फिकाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. इ-गटातील पहिल्या दोन सामन्यांत मिळून केवळ एक गुण मिळवणाऱ्या चेल्सीने एसी मिलानविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे होते. चेल्सीला २४व्या मिनिटाला कॉर्नर कीक मिळाली. यावर वेस्ली फोफानाने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात चेल्सीने आक्रमणावर अधिक भर दिला. ५६व्या मिनिटाला रीस जेम्सच्या साहाय्याने पिएर एमरीक-ऑबामियांगने गोल करत चेल्सीची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर ६२व्या मिनिटाला जेम्सने केलेल्या गोलमुळे चेल्सीने हा सामना ३-० अशा फरकाने जिंकला.

दुसरीकडे, पॅरिस सेंट-जर्मेनला पोर्तुगीज संघ बेन्फिकाने १-१ असे बरोबरीत रोखले. २२व्या मिनिटाला लिओनेल मेसीने गोल करत पॅरिसला आघाडी मिळवून दिली. मात्र, ४१व्या मिनिटाला डॅनिलो परेराकडून झालेल्या स्वयंगोलमुळे बेन्फिकाने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. रेयाल माद्रिदने विजयी घोडदौड कायम ठेवताना शाक्तार डोनेस्कचा २-१ असा पराभव केला. अर्लिग हालंडच्या दोन गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने कोपेनहेगनवर ५-० अशी मात केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारताचे वर्चस्वपूर्ण कामगिरीचे लक्ष्य!; आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या महिला संघाशी सामना

संबंधित बातम्या

Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
IPL 2023: ‘टॅक्टिकल सबस्टिट्युशन म्हणजे काय रे भाऊ?’ आयपीएलच्या १५व्या हंगामापासून सुरु होणार नवीन नियम
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर
“तो खेळाडू भारताला विश्वचषक जिंकवून देईल” ब्रेट ली म्हणाला, “रोहित, द्रविडने फक्त….”
ASIA CUP: “भारताशिवाय आशिया चषक आम्ही खेळू पण पाकिस्तान…” रमीज राजा यांनी दिली धमकी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे दिलासा
न्यायवृंद व्यवस्था पारदर्शकच; ती कोलमडून पडू नये; सर्वोच्च न्यायालयाचे मत
मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका! ; कर्नाटकचे महाराष्ट्राला पत्र; चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई दौऱ्यावर ठाम