राजकोट : भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा हा १४ मेपासून सुरू होणाऱ्या सौराष्ट्र प्रीमियर लीग या ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. पुजारा हा कसोटीसाठीचा विशेषज्ञ फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने महाराष्ट्रातील नवी मुंबईत होणाऱ्या डी. वाय. पाटील ट्वेन्टी-२० लीगमध्येही यापूर्वी सहभाग नोंदवला आहे. त्या पाश्र्वभूमीवर आता पुजारा हा सौराष्ट्र लीगमध्ये खेळणार असल्याची घोषणा सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने केली आहे. या विशेष लीगमध्ये पाच संघ सहभागी होणार असून संघमालकांच्या बैठकीत पुजारा कोणत्या संघाकडून खेळणार त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. कौंटी क्रिकेटमधून परवानगी मिळाल्यानेच पुजारा या लीगमध्ये खेळू शकणार आहे. पुजाराने भारतासाठी ६८ कसोटी सामने खेळले असून ५४२६ धावा केल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2019 रोजी प्रकाशित
सौराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पुजारा
पुजारा हा कसोटीसाठीचा विशेषज्ञ फलंदाज म्हणून ओळखला जातो.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 09-05-2019 at 00:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheteshwar pujara to play in saurashtra premier league