चेतेश्वर पुजारा हा भारतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या फलंदाजीला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मागील काही काळात आलेले नाही. पण काही काळ भारताकडून खेळताना तो थोडा आऊट ऑफ फॉर्ममध्ये दिसला होता, पण इंग्लंड कौंटी क्रिकेटकडून खेळताना त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत नवीन भरारी घेतली आहे. पुजाराने इंग्लंडच्या कौंटी संघाकडून खेळताना खूप चांगली कामगिरी केली. कौंटी संघ ससेक्ससाठी खेळताना त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे, त्यानंतर तो अलीकडेच भारताच्या देशांतर्गत इराणी चषकमध्ये सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना दिसला. आता चेतेश्वर पुजारा नव्या संघात येण्यासाठी सज्ज झाला आहे. खुद्द चेतेश्वर पुजाराने याचा खुलासा केला आहे.

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने सांगितले आहे की, तो लवकरच एका नवीन संघासाठी खेळताना दिसणार आहे. मात्र, तो कोणत्या संघाकडून खेळणार, याबाबत त्याने अद्याप खुलासा केलेला नाही. हा फोटो शेअर करत ३४ वर्षीय भारतीय फलंदाजाने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही नवीन इनिंग सुरू करताना खूप छान वाटत आहे! तुम्ही माझ्या नवीन संघाच्या नावाचा अंदाज लावू शकता का? अधिक माहितीसाठी संपर्कात रहा!’ यासोबतच त्याने #NewTeam #Cricket #Surprise चा वापर केला आहे.

पुजाराच्या या ट्विटवर त्याचे चाहतेही कमेंट करून आपले विचार मांडत आहेत. पुजारा एका नव्या जाहिरातीत दिसणार असल्याचे अनेक चाहत्यांना वाटते. त्याचवेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो सौराष्ट्र संघाकडून खेळू शकेल, अशी आशाही काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुजाराचे चाहतेही त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

हेही वाचा :  Women’s T20 Asia Cup: स्नेह राणाच्या फिरकीसमोर थायलंडचा संघ भुईसपाट, टीम इंडियाचा नऊ गडी राखून विजय 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेतेश्वर पुजाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द:

पुजाराने भारतीय संघासाठी १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत त्यात त्याने १६८ डावात ६८१६ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ९६ सामने खेळून पुजाराने १६४ डावांत ४३.८ च्या सरासरीने ६७९२ धावा केल्या आहेत आणि एकदिवसीय क्रिकेटमधील चार सामन्यांमध्ये ६.० च्या सरासरीने २४ धावा केल्या आहेत.