यूएईमध्ये सध्या आशिया चषक स्पर्धेची धूम आहे. अव्वल-४ मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक संघ पूर्ण ताकदीने प्रयत्न करताना दिसतोय. अफगाणिस्तान मात्र अगोदरच सुपर-४ मध्ये पोहोचला आहे. या संघाने श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यासोबतचे दोन्ही सामने जिंकले. असे असताना हा संघ आगामी सामन्याच्या तयारीला लागला आहे. मात्र त्यापूर्वी अफगाणिस्तान संघाचे गोलंजादीचे प्रशिक्षक आणि पाकिस्तानचे माजी गोलंदाज उमर गुल यांच्या पत्नीने त्यांना चांगलेच संकटात टाकले आहे. गुल यांच्या पत्नीने त्यांना पाकिस्तानसोबतच्या लढतीत थोडं मवाळ धोरण अवलंबावे अशी विनंती केली आहे. चेष्टेच्या सुरात केलेल्या या विनंतीला उमर गुल यांनी तेवढ्याच विनोदाने प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा >> माझ्या यशामध्ये धोनीचा सिंहाचा वाटा; हार्दिक पंड्या

उमर गुल यांची पत्नी डॉ. मरियम नक्श यांनी गुल यांना ट्विटरवर विशेष विनंती केली आहे. पाकिस्तानी संघाविरोधात खेळताना थोडं मवाळ धोरण अवलंबा अशी मिश्लील विनंती त्यांनी केली आहे. उमर गुल यांनी पूर्वी पाकिस्तानी संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. हाच मुद्दा घेऊन डॉ. मरियम नक्श यांनी चेष्टेच्या सुरात ही विनंती केली आहे. तर दुसरीकडे गुल यांनी देखील या मागणीला तेवढ्याच मिश्किल पद्धतीने हसण्याचे इमोजी पाठवत ‘ओके’ असे उत्तर दिले आहे.

हेही वाचा >> क्रिकेटचा देव पुन्हा एकदा बॅट हातात घेणार, सचिन तेंडुलकर ‘या’ क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पती-पत्नींचा हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांची ट्विटवर एकमेकांना दिलेल्या उत्तरावर ट्विटर वापरकर्ते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. सुपर-४ मध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. याआधी पाकिस्तानचा सामना हाँगकाँगशी होणार आहे.