बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय वेटलिफ्टिंगपटू विकास ठाकूरने ९६ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. हे भारताचे एकूण १२वे तर वेटलिफ्टिंगमधील आठवे पदक ठरले आहे.

विकासने स्नॅच फेरीत १५५ किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीमध्ये १९१ किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण ३४६ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. सामोआचा वेटलिफ्टिंगपटू डॉन ओपालॉग विकासच्या पुढे होता. त्याने एकूण ३८१ किलो वजन उचलले. या वजनासह ओपलॉगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमही केला.

Navi Mumbai Municipal Commissioner Dr Kailas Shindes outstanding performance in Comrade Marathon in South Africa
द. आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची उल्लेखनीय लक्षणीय कामगिरी
Saurabh Netravalkar's key role in America's victory
USA vs PAK : १४ वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण! पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीनंतर सौरभवर भारतीय चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
Iga Schwiotek continues his dominance as he advances to the French Open sport
श्वीऑटेकचे वर्चस्व कायम; कोकोला नमवत फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम फेरीत
Virat's Reaction to T20 World Cup in America
T20 WC 2024 : “मी कधीही विचार केला नव्हता की…”, अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर विराट कोहलीचे मोठे वक्तव्य
Team India record in ICC T20 World Cup history
T20 WC 2024 : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कसा राहिलाय टीम इंडियाचा प्रवास? जाणून घ्या..
pv sindhu
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; अश्मिताचा तिसऱ्या मानांकित झँगला धक्का
Tejas Shirse
महाराष्ट्रातील तेजस शिरसेने मोडला राष्ट्रीय विक्रम, पुरुषांच्या अडथळा शर्यतीत ठरला अव्वल भारतीय!
World Para Athletics Championships Maharashtra Sachin Khilar wins gold sport news
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा: महाराष्ट्राच्या सचिनचे सुवर्णयश

२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतीय वेटलिफ्टिंगपटूंनी जोरदार कामगिरी केली आहे. मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुगा आणि अचिंत शेउली यांनी स्वर्ण, संकेत महादेव सरगर, बिंदियारानी देवी आणि विकास ठाकुर यांनी रौप्य तर गुरुराजा ठाकुर आणि हरजिंदर कौर यांनी कांस्यपदक पटकावले आहे.