अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याचे मुंबई पोलिसांच्या लक्षात आले होते. त्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. या अटकेनंतर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला एका गोष्टीसाठी ट्रोल करण्यात येत आहे. अजिंक्य आणि राज कुंद्रा यांचे ट्विटरवर एक संभाषण उघडकीस आले, ज्यात अजिंक्यने राज कुंद्राला ”सर तुम्ही करत चांगले काम करत आहात”, असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजिंक्य रहाणेने १९ ऑक्टोबर २०१२ रोजी राज कुंद्राला एका ट्वीटमध्ये टॅग केले होते. ”सर तुम्ही चांगले काम करत आहात”, असे अजिंक्यने ट्वीटमध्ये म्हटले. या बद्दल कुंद्राने अजिंक्यचे आभार मानले होते.

 

 

 

आज राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

राज कुंद्रा मुख्य आरोपी असल्याची पोलिसांची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणामध्ये राज कुंद्रा मुख्य आरोपी आहे. राज कुंद्राच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्याच आधारावर पोलिसांनी आज सकाळी रायन थार्प या व्यक्तीला अटक केली आहे. रायन थार्प देखील राज कुंद्राशी थेट संबंधित असून पॉर्न फिल्म निर्मितीमध्ये त्याचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

व्हिडीओ, ऑडिओ आणि इतर स्वरूपात अश्लीलतेचा आणि लैगिंक शोषणाचा प्रसार करणारे साहित्य तयार करणे वा इतरांना पाठवणे पोर्नोग्राफी प्रतिबंध कायद्याने गुन्हा आहे. अश्लील व्हिडीओ बनवणेही गुन्हा असून, चाईल्ड पोर्नोग्राफी बघणेही गुन्हा ठरवण्यात आलेले आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ मधील कलम ६७ (अ) आणि भादंवि कलम २९२, २९३, २९४, ५००, ५०६ आणि ५०९ यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा १० लाखांचा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer ajinkya rahane trolled after shilpa shettys husband raj kundra arrested adn
First published on: 20-07-2021 at 16:51 IST