पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने नेटफ्लिक्सवरील माहितीपटात तिच्या आयुष्यातील काही पैलू शेअर केले आहेत. रोनाल्डोला भेटण्यापूर्वी माझी आर्थिक स्थिती चांगली नव्हती, मी एका छोट्या गोदामात राहत होती, असे तिने सांगितले आहे.

२७ वर्षीय जॉर्जिना रॉड्रिग्जने नेटफ्लिक्सवरील एका डॉक्युमेंटरी व्हिडिओमध्ये सांगितले, ”रोनाल्डोला भेटण्यापूर्वी मला २५० युरो खर्च करून एका लहान गोदामात राहावे लागत होते. त्या गोदामात उन्हाळा किंवा हिवाळ्यात नीट व्यवस्था होईल, असे काहीही नव्हते. माझ्याकडे एसी किंवा हीटर घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. स्पेनमधील माझे सुरुवातीचे दिवस वाईट होते. रोनाल्डोला भेटल्यापासून माझे आयुष्य बदलले.”

हेही वाचा – बाबो..! फुटबॉलपटू रोनाल्डोनं १३ वर्षात बदलल्या १८ गर्लफ्रेंड; ‘या’ भारतीय अभिनेत्रीलाही त्यानं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहानपणीच स्पेन (माद्रिद) येथे पोहोचलेल्या जॉर्जिनाने सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी दुकानात काम केले. रोनाल्डोला डेट करण्यापूर्वी तिने माद्रिदमधील एका दुकानात १० युरो प्रति तास पगारावर काम केले होते. रोनाल्डो २०१७ पासून अर्जेंटिनाची मॉडेल असलेल्या जॉर्जिनासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ऑक्टोबरमध्ये दोघांनी त्यांच्या आगामी जुळ्या मुलांची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. यापूर्वी १२ नोव्हेंबर २०१७ रोजी जॉर्जिनाने रोनाल्डोची मुलगी अलाना मार्टिनाला जन्म दिला होता.