पीटीआय, मियामी : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदची एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेतील विजयाची मालिका शनिवारी खंडित झाली. पाचव्या फेरीच्या लढतीत चीनच्या क्वँग लिएम लीने प्रज्ञानंदला २.५-०.५ अशा फरकाने पराभूत केले.

प्रज्ञानंदने या स्पर्धेची अप्रतिम सुरुवात करताना पहिल्या चार फेऱ्यांमध्ये अनुक्रमे अलिरझा फिरौझा, अनिश गिरी, हान्स निमन आणि लेव्हॉन अरोनियन यांच्यावर मात केली होती. पाचव्या फेरीत मात्र त्याला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. या लढतीतील पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर लिएमने दुसऱ्या आणि तिसऱ्या डावात विजयांची नोंद केली.

दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनचा यान-क्रिस्टोफ डुडाने चार डावांमधील २-२ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये २-४ असा पराभव केला. मात्र, पाच फेऱ्यांअंती कार्लसन अग्रस्थानी कायम असून त्याच्या खात्यावर १३ गुण आहेत. दुसऱ्या स्थानावरील प्रज्ञानंदचे १२ गुण आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्य लढतींमध्ये फिरौझाने निमनला, तर गिरीने अरोनियनला २.५-०.५ अशा फरकाने पराभूत केले. या विजयांनंतर फिरौझा ११ गुणांसह तिसऱ्या स्थानी असून गिरी सात गुणांसह पाचव्या स्थानी आहे.