करोनाला ‘बोल्ड’ करत स्टार गोलंदाजाची RCB संघात एन्ट्री!

RCBने ट्विट करत दिली माहिती

rcb
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएल 2021मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) शानदार प्रदर्शन केले आहे. या गोष्टीसोबतच त्यांच्यासाठी अजून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. डावखुरा गोलंदाज डॅनियल सॅम्स बंगळुरू संघात सामील झाला आहे. आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे 7 एप्रिलला तो करोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्याला क्वारंटाइन करण्यात आले.

मात्र, आता तो करोनातून सावरला असल्याने संघाच्या बायो बबलममध्ये सामील झाला आहे. आरसीबी व्यवस्थापनाने आज एक निवेदन जारी करून सॅम्सबाबत माहिती दिली.

 

सॅम्सची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरसीबीचे वैद्यकीय पथक त्याच्याशी सतत संपर्कात होते. बीसीसीआय प्रोटोकॉलची सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. डॅनियल सॅम्स हा आरसीबी दुसरा खेळाडू होता, ज्याला करोनाची लागण झाली होती. याआधी आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीकक्कलही करोना पॉझिटिव्ह आढळला होत. चाचणी निगेटिव्ह आढळल्यानंतर तो देखील संघात सामील झाला.

आयपीएल 2021मध्ये आतापर्यंत आरसीबीने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आरसीबीचा सामना कोलकाता नाईट रायडर्सबरोबर (केकेआर) होईल. आरसीबीने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. दुसर्‍या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादला हरवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Daniel sams is out of quarantine and has joined the rcb bio bubble adn

ताज्या बातम्या