David Warner equals Sachin Tendulkar’s record: डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये सलग दुसरे शतक झळकावून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. विश्वचषकाच्या इतिहासातील वॉर्नरचे हे सहावे शतक होते. यासह, तो आता या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा सचिनसोबतचा संयुक्त खेळाडू बनला आहे. यासोबतच वॉर्नरने सध्याच्या स्पर्धेत भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही मागे टाकले आहे. रोहित शर्माच्या नावावर ५ सामन्यात ३११ धावा आहेत तर वॉर्नरने त्याच्या पुढे जाऊन आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. क्विंटन डी कॉक ४०७ धावांसह अव्वल स्थानावर आहे.

वॉर्नरने मास्टर ब्लास्टरच्या विक्रमाशी केली बरोबरी –

डेव्हिड वॉर्नरने या डावात ९१ चेंडूत २२२ वे वनडे शतक पूर्ण केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय विश्वचषकात आपल्या कारकिर्दीत एकूण ६ शतके झळकावली होती. तर डेव्हिड वॉर्नरने या विश्वचषकात आपले दुसरे शतक तर विश्वचषकाच्या इतिहासातील सहावे शतक झळकावले आहे. या बाबतीत रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक सात विश्वचषक शतके आहेत. या यादीत विराट कोहली अजूनही ३ शतकांसह खूप मागे आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांच्या बाबतीत त्याने सौरव गांगुली आणि तिलकरत्ने दिलशानची बरोबरी केली आहे.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Updates in marathi
IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज –

रोहित शर्मा – ७
सचिन तेंडुलकर – ६
डेव्हिड वॉर्नर- ६
कुमार संगकारा- ५
रिकी पाँटिंग- ५

हेही वाचा – World Cup 2023: राहुल द्रविडसह भारतीय कोचिंग स्टाफने धरमशालामध्ये ट्रायंड ट्रेकचा घेतला आनंद, पाहा VIDEO

राहुल द्रविडच्याही विक्रमाशी केली बरोबरी –

डेव्हिड वॉर्नरचे हे ४८ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. या बाबतीत त्याने टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची बरोबरी केली आहे. तो एबी डिव्हिलियर्सच्याही पुढे गेला ज्यांच्या नावावर ४७ आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सक्रिय क्रिकेटपटूंच्या यादीत, वॉर्नर विराट कोहली (७८) नंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा खेळाडू आहे.