भारतीय महिला संघाचा नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज यांनी प्रथम फोनवर बोलले पाहिजे आणि त्यांचे मतभेद मिटवले पाहिजेत, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ताने व्यक्त केले आहे. रमेश पोवार दुसऱ्यांदा प्रशिक्षक झाल्यानंतर दीप दासगुप्ताने ही प्रतिक्रिया दिली. आहे. रमेश पोवार यापूर्वीही भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक होता पण मिताली राजशी झालेल्या मतभेदांमुळे त्याला हे पद सोडावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीप दासगुप्ता म्हणाला, ”काय झाले ते आम्हाला ठाऊक नाही, परंतु तेथे काहीतरी घडले हे आपल्या सर्वांना माहित आहे. मिताली तुमची ५० षटकांची कर्णधार आहे आणि ती एक महान क्रिकेटपटू आहे, यात कोणतीही दोन मते नाहीत. निराकरण करणे आवश्यक आहे. मला वाटते की मतभेद सोडवण्यासाठी प्रथम फोन कॉल करणे ही एक गोष्ट आहे.”

बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि ३५हून अधिक जणांनी या पदासाठी आपले नाव दिले होते. सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंह यांच्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने अर्जदारांची मुलाखत घेतली आणि पोवारच्या नावावर एकमताने सहमती दर्शविली.

 

मिताली राजशी झाला होता वाद

२०१८मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप दरम्यान रमेश पोवार भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक होता. त्यावेळी मिताली राजशी झालेला वाद चर्चेत आला होता. वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात मितालीला खेळू न दिल्यामुळे हा वाद सुरू झाला. नंतर पोवारला या पदावरून हटविण्यात आले. मिताली राज सध्या भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार आहे.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deep dasgupta said that ramesh powar and mithali raj should sort out their differences adn
First published on: 14-05-2021 at 12:20 IST