सोनीपत : भारताची रीकव्‍‌र्ह प्रकारातील माजी अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीने वैयक्तिक कारणाने गेले वर्षभर खेळापासून दूर रहावे लागल्यानंतर नव्या हंगामात जोरदार पुनरागमन केले. आगामी पॅरिस ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत दीपिकाने अग्रस्थान पटकावत बाजी मारली.

दीड वर्षांहून अधिक काळानंतर पुनरागमन करताना ऑलिम्पिकपटू दीपिकाने या वर्षी फेब्रुवारीत आशिया करंडक स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवली. त्यानंतर आता ऑलिम्पिक निवड चाचणीत अग्रस्थान पटकावत दीपिकाने भजन कौर, अंकिता भाकट आणि कोमलिका बारीसह भारतीय संघात स्थान मिळवले. सिमरनजीतला या संघात स्थान मिळाले नाही.

हेही वाचा >>> RCB won WPL 2024 : श्रेयंका पाटीलने इतिहास रचला, हेली मॅथ्यूजला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारी पहिली खेळाडू

भारताला महिला विभागात अजून ऑलिम्पिक कोटा मिळवता आलेला नाही. आता अन्ताल्या येथे १८ ते २३ जून दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेतून भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवण्याची अखेरची संधी असेल. पुरुष विभागात आतापर्यंत केवळ धीरज बोम्मादेवराला ऑलिम्पिक कोटा मिळवण्यात यश आले आहे. विश्वचषक स्पर्धेला २१ एप्रिलपासून शांघाय येथे सुरुवात होईल. दुसरी स्पर्धा २१ ते २६ मे दरम्यान येचेऑनला होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघ

* रीकव्‍‌र्ह (पुरुष) : धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय, प्रवीण जाधव, मृणाल चौहान; (महिला) : दीपिका कुमारी, भजन कौर, अंकिता भाकट, कोमलिका बारी. * कम्पाऊंड (पुरुष) : प्रथमेश फुगे, अभिषेक वर्मा, रजत चौहान, प्रियांश; (महिला) : ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी, परिणीत कौर, अवनीत कौर.