जागतिक क्रमवारीतील चौथा मानांकित खेळाडू स्टॅनिस्लास वॉवरिन्का हा चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी यंदा खेळणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे.
ही स्पर्धा ५ ते ११ जानेवारी दरम्यान आयोजित केली जाणार आहे. गतवर्षी वॉवरिन्काने आपल्या बॅकहँडच्या सुरेख फटक्यांच्या जोरावर दुसऱ्यांदा या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. पाठोपाठ त्याने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत राफेल नदालला हरवून विजेतेपदाचे स्वप्न साकार केले होते.
‘‘चेन्नईत सातव्यांदा खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तेथील स्पर्धा माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय ठरली आहे, असे सांगून वॉवरिन्क म्हणाला, नव्या वर्षांची सुरुवात मी चेन्नई ओपन स्पर्धा जिंकूनच करणार आहे. तेथे सर्वोत्तम कौशल्य दाखविण्याचा माझा प्रयत्न राहील,’’ असे वॉवरिन्काने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2014 रोजी प्रकाशित
चेन्नई खुली टेनिस स्पर्धा : विजेतेपद राखण्यासाठी वॉवरिन्काचा सहभाग निश्चित
जागतिक क्रमवारीतील चौथा मानांकित खेळाडू स्टॅनिस्लास वॉवरिन्का हा चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी यंदा खेळणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे.
First published on: 27-08-2014 at 02:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defending champion stan wawrinka confirms participation for chennai open