डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या बिवॅन झँगने सिंधूची झुंज 3 सेटमध्ये 17-21, 21-16, 18-21 अशी मोडून काढली. या स्पर्धेत सिंधू आणि सायनावर भारताची मदार होती. मात्र सिंधू पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर गेल्यामुळे आता भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा सायना नेहवालवर आहेत. या दोन्ही खेळाडूंमधला सामना अवघ्या 56 मिनीटांमध्ये आटोपला. झँगकडून पराभूत होण्याची सिंधूची ही तिसरी वेळ ठरली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या Indian Open स्पर्धेच्या अंतिम फेरीत झँगने सिंधूवर मात केली होती. त्यामुळे आपल्या खराब फॉर्ममधून सिंधू किती लवकर सावरते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2018 रोजी प्रकाशित
Denmark Open Badminton : सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का
अमेरिकेच्या बिवॅन झँगने केली मात
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 16-10-2018 at 15:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denmark open badminton 2018 p v sindhu suffer setback in first round from bewan zang of usa