किदम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅर्डंमटनपटू पी. व्ही. सिंधूने गुरुवारी थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानविरुद्ध तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवत डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

महिला एकेरीत सिंधूने ६७ मिनिटांच्या झुंजीनंतर बुसाननवर २१-१६, १२-२१, २१-१५ असा विजय मिळवला. ऑगस्ट महिन्यात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूची विश्रांतीनंतरची ही पहिलीच स्पर्धा आहे.

पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या किदम्बी श्रीकांतचा क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या केंटो मोमोटापुढे निभाव लागला नाही. पहिल्या गेममध्ये मोमोटाला झुंजवणाऱ्या श्रीकांतने २१-२३, ९-२१ असा पराभव पत्करला.

मिश्र दुहेरीत टँग शून मॅन आणि से यिंग सुएट जोडीने धु्रव कपिला आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचे आव्हान २१-१७, १९-२१, २१-११ असे मोडीत काढले.