या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या लक्ष्य सेनने डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. १९ वर्षीय लक्ष्यने ख्रिस्तो पोपोवला २१-९, २१-१५ असे पराभूत केले.

डेन्मार्क स्पर्धेद्वारे करोना साथीच्या काळात सात महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला सुरुवात झाली आहे. पोपोवविरुद्ध पहिल्या गेममध्ये ११-८ या आघाडीतून लक्ष्यने सुरुवातीपासून नियंत्रण ठेवले होते. दुसऱ्या गेममध्ये १२-१२ अशी चुरस होती. मात्र लक्ष्यने त्यातून १५-१२ अशी आघाडी घेत विजय निश्चित केला.

‘‘स्पर्धेत चांगली सुरुवात करता आली. दुसऱ्या गेममध्ये माझ्या काही चुका झाल्याने पोपोवला आघाडी घेता आली होती. मात्र त्यातून सावरता आले. सात महिन्यानंतर स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळता आल्याचा आनंद आहे,’’ असे जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने सांगितले. लक्ष्यने गेल्या वर्षी पाच विजेतेपदे पटकावली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denmark open badminton tournament lakshya enters the second round abn
First published on: 14-10-2020 at 00:19 IST