Devdutt Padikkal Maiden Half Century: भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलला इंग्लंडविरूध्दच्या पाचव्या कसोटीसाठी पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचा दोन्ही हातांनी फायदा उचलत पडिक्कलने पदार्पणाच्या सामन्यातच गगनचुंबी षटकार लगावत शानदार अर्धशतक झळकावले आहे. या डावखुऱ्या युवा फलंदाजाने ८४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. पडिक्कलने त्याच्या इनिंगच्या सुरूवातीलाच अँडरसनच्या गोलंदाजीवर ५ चौकार लगावले. १०० वा कसोटी सामना खेळत असलेल्या आर अश्विनने पडिक्कलला कसोटी कॅप दिली. पण भारतासाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या पडिक्कलने आजारांचा सामना करत हा खडतर प्रवास करत पार केला.

रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकच्या या खेळाडूला केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर त्याचा बदली खेळाडू म्हणून संघात सामील केले. मोठ्या प्रतिक्षेनंतर पडिक्कलला दुखापतग्रस्त रजत पाटीदारच्या जागी पदार्पणाची संधी मिळाली. पण इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा हा प्रवास खूपच त्रासांनी भरलेला होता. त्याला काही आजारांना सामोरे जावे लागले होते.

पडिक्क्ल हा २०२२ मध्ये काही महिने हॉस्पिटलमध्ये होता. या आजारपणामुळे त्याचे काही किलो वजन कमी झाले आणि अखेरीस त्याला संघर्ष करावा लागला. गेल्या वर्षीच्या आयपीएलनंतर राजस्थान रॉयल्सकडून त्याला लखनौ सुपर जायंट्सने ट्रेड केले. २०२१ ते २०२१ या काळात पडिक्कल फिट राहण्यासाठी खूप संघर्ष करत होता.पोटाच्या आजाराने तो सतत त्रस्त होता.

पडिक्क्लने २०२४ च्या रणजी करंडक स्पर्धेत अद्वितीय कामगिरी केली आणि त्याच्या या शानदार कामगिरीची दखलही घेण्यात आली. या २३ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने सहा डावांत ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत. पंजाबविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने सर्वाधिक १९३ धावांसह तीन शतके झळकावली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर तामिळनाडूविरुद्धची १५१ धावांच्या खेळीने पडिक्कलने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासमोरच डावखुऱ्या फलंदाजाने रणजी करंडकातील तिसरे शतक झळकावले. अलीकडील रणजी सामन्यांपूर्वी त्याने अहमदाबाद येथे भारत अ साठी ६५, २१ आणि १०५ धावांच्या इनिंगने प्रभावित केले आहे. गेल्या काही मोसमात त्याच्या खेळात जे सातत्य नव्हते ते त्याने परत मिळवत दमदार कामगिरी केली.