भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देऊन क्रीडा क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असल्याचे म्हटले आणि सचिनला मानाचा मुजरा केला.
सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू पुन्हा होणे नाही असे म्हणत सचिन देशाच्या युवा खेळाडूंच्या नेहमी आदर्श स्थानी राहील असे धोनीने म्हटले. अशा विक्रमादित्य खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देऊन योग्य सन्मान केला असल्याचेही धोनी म्हणाला.
एखाद्या खेळाडूला पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार मिळला ही अतिशय आनंदादायी गोष्ट आहे. देशाचा एक नागरिक म्हणून तुम्हाला मिळणारा हा सर्वात मोठा सन्मान आहे आणि तो योग्य व्यक्तीला मिळाला आहे. सचिन भारतरत्न पुरस्काराचा हक्काचा मानकरी आहे. असेही धोनी पुढे म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2014 रोजी प्रकाशित
धोनीचा भारतरत्न सचिनला सलाम
सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू पुन्हा होणे नाही असे म्हणत सचिन देशाच्या युवा खेळाडूंच्या नेहमी आदर्श स्थानी राहील असे धोनीने म्हटले. अशा विक्रमादित्य खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देऊन योग्य सन्मान केला असल्याचेही धोनी म्हणाला.

First published on: 05-02-2014 at 03:32 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni pays tribute to sachin tendulkar