Dhruv Jurel Stumping: मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३५८ धावा केल्या. पण या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५०० धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडकडून जो रूटने विक्रमी १५० धावांची खेळी केली. त्याला बाद करण्यासाठी रवींद्र जडेजाने फिरकी घेणारा चेंडू टाकला आणि यष्टीमागे असलेल्या ध्रुव जुरेलने वाऱ्याच्या वेगाने स्टंपिंग केली.

ध्रुव जुरेलची वाऱ्याच्या वेगाने स्टंपिंग

तर झाले असे की, भारतीय संघाकडून १२० वे षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. रूटने २४७ चेंडू खेळून काढले. पण २४८ व्या चेंडूवर तो जडेजाच्या जाळ्यात अडकला. जडेजाने या षटकातील दुसरा चेंडू मिडल आणि ऑफ स्टंपवर टाकला. हा चेंडू टप्पा पडताच बाहेरच्या दिशेने वळला. रूट शॉट खेळण्यासाठी पुढे सरकावला, या प्रयत्नात फटका फसला पण त्याचा पाय क्रिझच्या बाहेर आला. ध्रुव जुरेलने कुठलीही चूक न करता वाऱ्याच्या वेगाने स्टंपिंग केली आणि जो रूटला १५० धावांवर माघारी परतावं लागलं.

जो रूटचं विक्रमी शतक

मँचेस्टर कसोटीत फलंदाजी करताना जो रूटने अनेक विक्रम मोडून काढले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत केवळ सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. जो रूटने १३३७९ धावांचा पल्ला गाठताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरने १५९२१ धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर – १५९२१ धावा
जो रूट – १३३७९ धावा
रिकी पाँटिंग – १३३७८ धावा
जॅक कॅलिस – १३२८९ धावा
राहुल द्रविड – १३२८८ धावा

भारताविरूद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जो रूटने भारतीय संघाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये १२ वे शतक झळकावले आहे. यासह तो भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम स्टीव्ह स्मिथच्या नावावर होता. स्मिथने भारतीय संघाविरुद्ध खेळताना ११ शतकं झळकावली होती.