डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली.

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक
मुरली श्रीशंकर

मोनॅको : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

सहा दिवसांपूर्वी बर्मिगहॅम येथे ऐतिहासिक रौप्यपदक पटकावणाऱ्या श्रीशंकरकडून डायमंड लीग स्पर्धेत दिमाखदार कामगिरीची अपेक्षा केली जात होती. जोरदार वाऱ्यांचा पहिल्या फेरीतील खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम जाणवला. श्रीशंकरने राष्ट्रकुलमध्ये ८.०८ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. याचप्रमाणे चालू हंगामात ८.३६ मीटर अशी वैयक्तिक कामगिरीसुद्धा त्याच्या खात्यावर आहे. युजेन येथे गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ७.९६ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवत श्रीशंकरने सातवा क्रमांक मिळवला होता.

२३ वर्षीय श्रीशंकरने पहिल्या प्रयत्नात ७.६१ मीटर अंतरावर उडी घेतली. मग दुसऱ्या प्रयत्नात ७.८४ मीटर आणि तिसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात ७.८३ मीटर उडी घेतली. पहिल्या प्रयत्नानंतर सहाव्या क्रमांकावरील श्रीशंकर तिसऱ्या प्रयत्नानंतर आठव्या स्थानावर फेकला गेला, तरी आव्हान शाबूत मात्र तो राखू शकला. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात ७.६९ मीटर आणि पाचव्या प्रयत्नात ७.९४ मीटर अंतरापर्यंत त्याने मजल मारल्याने सहावे स्थान मिळवता आले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Diamond league athletics long jumper sreesankar finished sixth ysh

Next Story
विश्लेषण: बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये अखेरच्या फेऱ्यांमधील चुकांचा भारताला फटका?
फोटो गॅलरी