विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौर्‍यावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी अंतिम २०२१) गमावल्यानंतर आता त्याला भारताला इंग्लंडबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. इंग्लंड दौर्‍यावर गुजरातचा क्रिकेटपटू अर्जन नागवासवालाही आहे. या दौर्‍यावर त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाल्यास तब्बल ४६ वर्षानंतर एक पारसी खेळाडू टीम इंडियामध्ये दिसू शकेल. अर्जनची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

अर्जनपूर्वी फारुख इंजिनियर हे टीम इंडियाचे विमान पकडणारे पारसी क्रिकेटपटू होते. १९६१ध्ये इंजिनियर यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तर १९७५मध्ये ते शेवटचा कसोटी सामना खेळले होते. अर्जनने २०१८मध्ये बडोद्याविरूद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले. वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध एका डावात ५ विकेट घेत तो चर्चेत आला. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या अर्जनने आपल्या क्रशविषयी सांगितले.

हेही वाचा – VIDEO : सॅम करनची ‘अफलातून’ करामत, क्रिकेटच्या सामन्यात घडवलं फुटबॉलचं दर्शन!

माजी क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करायची आहे, असे अर्जन म्हणाला. सेलिब्रिटी क्रशबद्दल तो म्हणाला, ”दिशा पटानी गेल्या काही काळापासून माझी क्रश आहे.” आपल्या आवडत्या जागेबद्दल विचारले असता, अर्जन म्हणाला, की इंग्लंड दौरा ही त्याची पहिली विदेश यात्रा आहे. या जागेवर त्याचे खूप प्रेम आहे. म्हणूनच त्याला फक्त इंग्लंड पाहायला आवडेल.

अर्जनची कामगिरी

अर्जनने गुजरातसाठी १६ प्रथम श्रेणी, २० लिस्ट-ए आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये अनुक्रमे त्याने ६२, ३९ आणि २१ बळी घेतले आहेत. २०१९-२० मध्ये अर्जनने शानदार कामगिरी करत ४१ बळी घेतले. रणजी करंडक या हंगामात झाला नाही. पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने गुजरातसाठी १९ बळी टिपले, ज्यामुळे भारतीय संघात स्थान मिळविण्यात तो यशस्वी झाला.