श्री गणेश व्यायाम शाळा पुरस्कृत सत्यम सेवा मंडळातर्फे आयोजित तृतीय श्रेणी जिल्हा कबड्डी स्पध्रेत साईकृष्ण मित्र मंडळाने  ४४-२२ अशा फरकाने आंबेवाडी क्रीडा मंडळाचे आव्हान सहज परतवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागर चव्हाणच्या उत्कृष्ट पकडीमुळे साईकृष्ण संघाने हा विजय मिळवला.  अमर प्रतिष्ठान संघाने विशाल चव्हाणच्या खोलवर चढाई आणि सुरज घाडगेच्या पकडींच्या जोरावर श्री लक्ष्मीमाता संघाचा ३३-१४ असा पराभव केला. अमित पालकर व सुशांत देसाईच्या खेळाच्या जोरावर ज्ञानप्रकाश क्रीडा मंडळाने ४१-३२ अशा फरकाने सिद्धीप्रभा फाऊंडेशनचा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District kabaddi championship
First published on: 11-03-2016 at 04:29 IST