scorecardresearch

ILT20 2023: ‘काट्याचा नायटा म्हणतात ते असं!’ कॅच पकडायला गेला अन् थेट स्ट्रेचरवर बसून रुग्णालयात, Video व्हायरल

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट लीग (ILT20) मधील एका सामन्यादरम्यान डॉमिनिक ड्रेक्स कॅच घेताना गंभीर जखमी झाला होता. त्याला स्ट्रेचरवर पडून रुग्णालयात नेण्यात आले.

Dominic Drax caught a painful catch was taken to the hospital on a stretcher
सौजन्य- (ट्विटर)

International League T20: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अपघात होतात. कधी चुकतात तर कधी चांगले खेळ करून शाबासकी मिळवण्यात यशस्वी होतात. मात्र यादरम्यान खेळाडू स्वतः अधिक जखमी करून घेतात आणि हाच खूप मोठा धोका असतो. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई मध्ये सुरू असलेल्या इंटरनॅशनल लीग टी२० मध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू डॉमिनिक ड्रेक्ससोबत असे काही घडले की तो मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये गेला.

सोमवारी गल्फ जायंट्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यात सामना सुरू होता. शारजाच्या संघातील फलंदाजाने मारलेला शॉट हवेत गेला, जो डॉमिनिक ड्रेक्सने पकडण्यासाठी सूर मारत डायव्ह केला. या प्रयत्नात त्याचा हात तुटला. वेदनेने आक्रंदत असलेला डॉमिनिक उठण्याच्या मनस्थितीतही नव्हता. त्याच्यासाठी ताबडतोब स्ट्रेचर मागवण्यात आले अक्षरशः जमिनीवर तो व्हीवळत होता.

ILT20 स्पर्धेत एकापेक्षा एक उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळत आहेत, मात्र याच दरम्यान एक वेदनादायक घटना घडली आहे. वास्तविक, ही घटना कॅरेबियन अष्टपैलू डॉमिनिक ड्रेक्ससोबत घडली आहे. शारजाह वॉरियर्स आणि गल्फ जायंट्स यांच्यातील या सामन्यात ड्रेक्सने शानदार झेल घेतला, पण यादरम्यान त्याचा चेहरा जमिनीवर आदळला.

शारजा वॉरियर्सच्या डावातील सहाव्या षटकात ही घटना घडली. गोलंदाजी कार्लोस ब्रॅथवेटने केली आणि मोईन अली फलंदाजी करत होता. मोईन अलीने लेग साईडला चेंडू हवेत मारत शानदार फटका मारला पण डॉमिनिक ड्रेक्स वेगाने धावत आला आणि त्याने जबरदस्त सूर मारत झेल टिपण्याचा प्रयत्न केला. ड्रॅक्स त्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला, परंतु या दरम्यान त्याचा चेहरा आणि हात जमिनीवर इतका जोरात आदळला की तो उठू शकला नाही. डॉमिनिक ड्रॅक्सची अवस्था पाहून वैद्यकीय पथक तात्काळ मैदानावर आले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. शरीराची पर्वा न करता ड्रॅक्सने ज्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न केला त्याचे चाहते जगभरात कौतुक करत आहेत. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गल्फ जायंट्सने विजयाची नोंद केली

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गल्फ जायंट्सने शारजाह वॉरियर्सचा ७ विकेट्सने पराभव केला आणि डॉमिनिक ड्रेक्सची मेहनत वाया जाऊ दिली नाही. आंतरराष्ट्रीय लीग टी२०च्या ३० व्या सामन्यात गल्फ जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड विजेच्या नेतृत्वाखाली जायंट्सच्या गोलंदाजांनी मोईन अलीच्या संघाला मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. शारजाचा संपूर्ण संघ १८.३ षटकांत १०७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डेव्हिडने ४ षटकात केवळ २० धावा देत ५ बळी घेतले. कार्लोस ब्रॅथवेटला २ बळी मिळाले. प्रत्युत्तरात गल्फ जायंट्सने १७व्या षटकात ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. डेव्हिड विजे सामनावीर ठरला.

हेही वाचा: IND vs AUS 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात मिस्टर ३६० सुर्याला संघात स्थान नाही, भारतीय दिग्ग्जाने निवडली प्लेईंग ११

२५ वर्षीय डॉमिनिक ड्रेक्स हा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू असून त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर वेस्ट इंडिजकडून १० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ६ विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत ILT20 लीगमध्ये ड्रेक्सने ७.४० च्या सरासरीने तीन विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 15:14 IST
ताज्या बातम्या