करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय IPL चे आयोजनही अनिश्चित काळासाठी लांबणीवर ढकलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहितचा २६४ धावांचा विक्रम कोण मोडणार? श्रीसंतने दिलं उत्तर

घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत. तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. काही लोक पूर्णपणे आराम करत आहेत. काही टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. मात्र या सर्व गोष्टी सांभाळून अनेक क्रीडापटू लाइव्ह चॅटच्यामार्फत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा फलंदाज मुरली विजय याने ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटपटू सौंदर्यवती एलिस पेरी हिच्यासोबत डिनर डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेवर आता एलिस पेरीने रिप्लाय दिला आहे.

लॉकडाउन स्पेशल… रोहितने भन्नाट कमेंट करत युवराजला केलं ट्रोल

एका क्रीडा वाहिनीसाठी इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून एलिस पेरीने संवाद साधला. महिला अँकर रिदिमा पाठक हिने तिची मुलाखत घेतली. त्या मुलाखती दरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यातच मुरली विजयच्या डेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने झकास उत्तर दिले. “डेटवर जायला मी तयार आहे, पण एका अटीवर… त्याने बिल भरायला हवं. तो डेटचे पैसे भरत असेल, तर मी डेटवर नक्की जाईन. तो खूप चांगला माणूस आहे’, असे मिस्किल उत्तर एलिस पेरीने दिले.

“बुमराह अजूनही ‘बच्चा’ आहे” म्हणणारा पाकिस्तानी क्रिकेटर आता म्हणतो…

मुरली विजयने इस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्याला लाईव्हमध्ये ‘तुला कोणासोबत डिनर डेटवर जाण्यास आवडेल?’ असा प्रश्न विचारला होता. यावर त्याने ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी हिचं नाव घेतलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ellyse perry reaction to murali vijay wish romantic dinner date vjb
First published on: 04-05-2020 at 09:02 IST