टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर आणि IPL मधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा ३० एप्रिलला वाढदिवस झाला. रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ ला नागपूरमध्ये झाला. दोन दिवसांपूर्वी रोहितने ३४ व्या वर्षात पदार्पण केले. पण सध्या देशभरात लॉकडाउन चालू असल्याने रोहितचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे अनेक चाहत्यांचे स्वप्न यंदाच्या वर्षी अर्धवट राहिले. त्यामुळे रोहितचे सारे चाहते आणि संघ सहकारी यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मुंबई इंडियन्सच्या आजी माजी खेळाडूंचाही यात समावेश होता. त्यातील युवराजच्या हेअरस्टाईलवर रोहितने मजेशीर कमेंट करत त्याला ट्रोल केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टेनच्या संघात भारतीय खेळाडू नाही; डीव्हिलियर्सही संघाबाहेर

रोहित शर्मा IPL मध्ये मुंबईचे दीर्घ काळापासून प्रतिनिधित्व करत आहे. २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशी सर्वाधिक चार विजेतेपदे मुंबईकडे आहेत. त्यापैकी ३ विजेतेपदे मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वाखाली मिळवली. त्यामुळेच मुंबई इंडियन्स संघाने आपल्या लाडक्या रोहित शर्माला खास आणि हटके शुभेच्छा दिल्या. सामान्यत: उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थन आपण एखाद्याच्या वाढदिवशी करतो. पण मुंबई इंडियन्सने काहीशा हटके प्रकारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित, तुला अजून जास्त चौकार, षटकार, नवनवे विक्रम आणि खूप साऱ्या ट्रॉफी मिळोत, अशा आशयाच्या शुभेच्छा त्यांनी लाडक्या हिटमॅनला दिल्या. तसेच मुंबईने आजी-माजी खेळाडूंच्या व्हिडीओ शुभेच्छाही रोहितपर्यंत पोहोचवल्या. त्यातील युवराजच्या हेअरस्टाईलवर रोहितने मजेशीर कमेंट केली. ‘लॉकडाउनने खरंच तुझे केस उद्ध्वस्त केले’, असे म्हणत रोहितने युवराजला ट्रोल केलं.

रोहितचा २६४ धावांचा विक्रम कोण मोडणार? श्रीसंतने दिलं उत्तर

पाहा मजेशीर ट्विट –

रोहित शर्माची IPL कारकिर्द

रोहितने आतापर्यंत १८८ IPL सामन्यात १३० च्या स्ट्राईक रेटने आणि ३१.६० च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत. रोहितची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या १०९ आहे. त्याने आतापर्यंत ३६ अर्धशतके आणि १ शतक ठोकले आहे. याशिवाय त्याने ४३१ चौकार आणि १९४ षटकार खेचले आहेत. IPL च्या २०१३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना तर २०१५, २०१७ आणि २०१९ च्या हंगामात संघाचे नेतृत्व करताना त्याने विजेतेपदाची चव चाखली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus rohit sharma troll yuvraj singh for his hairstyle amid lockdown covid 19 vjb
First published on: 02-05-2020 at 10:37 IST