Mark Wood dismissing Steve Smith LBW video goes viral: ॲशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना १९ जुलैपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवला जात आहे. सलग दोन पराभवानंतर पुनरागमन करत यजमान इंग्लंडने शेवटचा कसोटी सामना तीन गडी राखून जिंकला. इंग्लंडच्या या विजयाचा हिरो मार्क वुड ठरला होता. मँचेस्टर कसोटी सामन्यातही मार्क वुड जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्क वुडने स्टीव्ह स्मिथला आपला बळी बनवत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी –

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पाचव्या षटकात धक्का बसला. जेव्हा सलामीवीर उस्मान ख्वाजा (१२ धावा) स्टुअर्ट ब्रॉडचा बळी ठरला. डेव्हिड वॉर्नर आक्रमक खेळी खेळताना दिसला, मात्र ३८ चेंडूत ३२ धावा करून ख्रिस वोक्सने त्याला बाद केले. त्यानंतर मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील भागीदारी बहरत असल्याचे दिसून आले होते.

KL Rahul Argues With Umpire in live match and Sledges Shivam Dube CSK vs LSG
IPL 2024: केएल राहुल लाइव्ह सामन्यात थेट पंचांवरच भडकला, दुबेलाही सुनावलं; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Mohammad Nabi's Son Video Viral
IPL 2024 : मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मुलाने मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: १४० किमीचा वेगवान चेंडू अन् २५ सेकंदात स्टंपिंग, भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर क्लासेनने धवनला केलं आऊट, VIDEO

स्टीव्ह स्मिथ मँचेस्टरमध्ये मोठी खेळी खेळताना दिसला पण मार्क वुडमुळे त्याच्या आशा धुळीस मिळाल्या. डावाच्या ३०व्या षटकात स्टीव्ह स्मिथ ५२ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्क वुडने एक वेगवान चेंडू टाकला जो अँगलसह आत आला, ज्याचा स्टीव्ह स्मिथला बचाव करायचा होता, पण तो चेंडू त्याच्या पॅडवर आदळला.

चेंडू पॅडवर आदळताच इंग्लंडला स्टीव्ह स्मिथ बाद झाल्याची खात्री पटली. पण मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी त्याला नाबाद घोषित केले. बेन स्टोक्सने मार्क वुड आणि यष्टिरक्षकाशी चर्चा केली आणि रिव्ह्यू मागितला. त्यानंतर पंचाना आपला निर्णय बदलावा लागला आणि स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

हेही वाचा – Asia Cup 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार भारत आणि पाकिस्तानचा सामना

स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लबुशेन यांनाही मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. मार्नस लाबुशेनला (५१ धावा) मोईन अलीने बाद केले. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेड (४८ धावा) स्टुअर्ट ब्रॉडचा बळी ठरला. त्यानंतर ख्रिस वोक्सने कॅमेरॉन ग्रीन (१६ धावा) आणि मिचेल मार्श (५१ धावा) यांना डावाच्या ६३व्या षटकात बाद करून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस अखरे ८३ षटकानंतर ८ बाद २९९ धावा केल्या आहेत.