Video : फलंदाज कसा बाद झाला हे गोलंदाजालादेखील समजले नाही, न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील गोंधळ

५६व्या षटकात हेन्री निकोल्स १९ धावांवर बाद झाला. त्याच्या रुपात न्यूझीलंडने आपला पाचवा गडी गमावला.

Henry Nicholls
फोटो सौजन्य – आयसीसी

सध्या भारताप्रमाणे न्यूझीलंडचा संघदेखील इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना लीड्समध्ये सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुणा फलंदाज हेन्री निकोल्स अतिशय विचित्र पद्धतीने बाद झाला. तो बाद झाल्यानंतर गोलंदाज जॅक लीचच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

५६व्या षटकात हेन्री निकोल्स १९ धावांवर बाद झाला. त्याच्या रुपात न्यूझीलंडने आपला पाचवा गडी गमावला. मात्र, निकोल्स कसा बाद झाला हे काही क्षण कुणाच्याही लक्षात आले नाही. गोलंदाज जॅक लीचच्या गोलंदाजीवर निकोल्सने सरळ फटका खेळला. तो चेंडू नॉन-स्ट्राइकिंग फलंदाज डेरेल मिशेलच्या बॅटला लागला आणि मिड-ऑफला उभ्या असलेल्या अॅलेक्स लीसच्या हातात गेला.

निकोल्स विचित्र पद्धतीने बाद झाला असली तरी त्याचा बळी नियमांना धरूनच आहे. क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या मेरीलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) ट्विट करून याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. “हा दुर्दैवी बळी असला तरी पूर्णपणे नियमांनाधरून आहे. नियम ३३.२.२.३ नुसार, जर यष्ट्या, पंच, इतर कोणताही क्षेत्ररक्षक, धावपटू किंवा फलंदाज यांना स्पर्शून गेलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने पकडला तर तो फलंदाज बाद असतो.

हेही वाचा – Video : विराट कोहलीकडून सल्ला घेऊन प्रसिद्ध कृष्णाने त्याच्याच साथीदाराला केले बाद!

त्यापूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात स्टुअर्ट ब्रॉडने टॉम लॅथमला बाद केले. यानंतर विल यंग २० धावा करून बाद झाला. कर्णधार केन विल्यमसनने कोविड-१९ मधून बरा झाल्यानंतर पुनरागमन केले. परंतु, तो केवळ ३१ धावा करू शकला. डेव्हॉन कॉनवे २६ धावा करून बाद झाला. या दरम्यान डेरेल मिशेलने आपले अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपूपर्यंत न्यूझीलंडचा संघ पाच बाद २२५ धावांवर होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eng vs nz kiwi batter henry nicholls gets dismissed in bizarre manner on jack leach delivery vkk

Next Story
Video : विराट कोहलीकडून सल्ला घेऊन प्रसिद्ध कृष्णाने त्याच्याच साथीदाराला केले बाद!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी