England vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषका २०२३च्या ४४व्या सामन्यात पाकिस्तानसमोर इंग्लंडचे आव्हान आहे. उभय संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचे आठ सामन्यांत चार गुण आहेत. त्याचबरोबर इंग्लंड आठ सामन्यांतून चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघ पहिल्यांदा गोलंदाजी करेल. नाणेफेक हरल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. बाबर आझमने संघात एक बदल केला. हसन अलीच्या जागी शादाब खानला संधी मिळाली आहे. त्याचवेळी इंग्लंडने एकही बदल केला नाही.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: राहुल-क्विंटन चेन्नईला पडले भारी, लखनौचा दणदणीत विजय
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 SRH vs CSK Highlights: चेन्नईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादने ६ विकेट्सने सहज जिंकला सामना
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड आणि पाकिस्तान १० वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी ५ पाकिस्तान आणि ४ वेळा इंग्लंड जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. या दोघांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९१ सामने झाले आहेत, त्यात पाकिस्तानने ३१ आणि इंग्लंडने ५६ जिंकले आहेत. त्याचबरोबर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. अलीकडच्या फॉर्मच्या आधारावर, पाकिस्तानचा वरचष्मा आहे, परंतु शेवटचा सामना जिंकल्यानंतर इंग्लंड देखील आत्मविश्वासाने भरलेला असेल.

हेही वाचा – Time Out Controversy: “पंच मला म्हणाले होते तू…”; टाईम आऊट वादावर प्रतिक्रिया देताना आश्विनने सांगितला ‘तो’ किस्सा

पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी किमान २८७ धावांनी विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर धावांचा पाठलाग ६ षटकांत विजय मिळवावा लागेल. जे जवळपास अशक्य आहे, त्यामुळे न्यूझीलंडचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के मानले जात आहे. तसेच इंग्लंडची नजर २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर असेल.

हेही वाचा – ICC on SLCB: श्रीलंकेला मोठा धक्का! आयसीसीने तात्काळ प्रभावाने क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व केले निलंबित

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ