इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी किम्बर्ली येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात इंग्लंडने बॉल आणि बॅटने शानदार कामगिरी करत ५९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडने या मैदानावर सर्वात मोठी धावसंख्या उभारली आणि प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३४६ धावा केल्या. या सामन्यातील इंग्लंडच्या मोईन अलीने असा एक फटका लगावला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोईन अलीने खेळला विचित्र शॉट –

जसजसे क्रिकेट विकसित होत आहे, तसतसे फलंदाजांकडून नवीन फटके शोधले जात आहेत. कधी हे प्रयोग हिट होतात, तर कधी फ्लॉपही होतात. दरम्यान, इंग्लंडच्या डावातील ४४ व्या षटकात अष्टपैलू मोईन अलीने काहीतरी मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला.

IRE vs AFD 1st Test Match Updates in Marathi
IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
Jan Nicol Loftie Eaton Breaks Kusal Malla's Record
VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

तबरेझ शम्सीने चेंडू टाकताच त्याने गोल फिरत आणि एका हाताने रिव्हर्स स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पण हा शॉट थोडा चांगल्या पद्धतीने खेळला असता, तर त्यावर धावा मिळाल्या असत्या. दरम्यान त्याचा हा फटका खेळतानाचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून मोईनने तलवारीसारखी बॅट फिरवल्याचे वाटत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे, तर बटलरने १२७ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १३१ धावा केल्या. डेव्हिड मलानने ११४ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११८ धावा केल्या. याशिवाय मोईन अलीच्या २३ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केलेल्या ४१ धावांच्या खेळीमुळे संघाला मोठी धावसंख्या गाठता आली. यजमानांकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

हेही वाचा – Virat Kohli Insta Story: शुबमनच्या धडाकेबाज शतकावर कोहलीची खास प्रतिक्रिया; इंस्टा स्टोरी शेअर करताना लिहिली ‘ही’ मोठी गोष्ट

३४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली, पण एकही खेळाडू मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला नाही. या कालावधीत हेनरिक क्लासेन (८०) आणि रीझा हेंड्रिक्स (५२) यांनी अर्धशतके झळकावली मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात आर्चरची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी खूप धुलाई केली होती. त्याचा बदला इंग्लिश गोलंदाजाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्स घेऊन घेतला. आर्चरने या कालावधीत ९.१ षटकात ४० धावा दिल्या.