पहिल्या दिवशी दमदार सुरुवातीनंतर दुसऱ्या दिवशी मात्र इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नाही. जोनाथन ट्रॉट (१२१) शुक्रवारी एकही धाव न करता तंबूत परतला. त्यानंतर इंग्लंडच्या डावाची पडझड सुरू झाली असली तरी मॅट प्रायरने १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची खेळी साकारली आणि त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ४६५ धावा केल्या. ब्रुस मार्टिनने या वेळी सर्वाधिक चार बळी
मिळवले.
इंग्लंडच्या धावसंख्येला आव्हान देताना दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची ३ बाद ६६ अशी अवस्था असून ते अजूनही ३९९ धावांची पिछाडीवर आहेत.